१८० तालुक्यात दृष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर, पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार

11

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय घेण्यात आल्यानंतर १८० तालुक्यांमध्ये  ताबडतोब उपाययोजनांना सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तालुक्यांमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच राज्यात येणार असल्याचंही कळतंय. केंद्रीत पथक आल्यानंतर ते आढावा घेतील त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर सर्व परिस्थितीचा अभ्यास करून प्रत्यक्ष दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा होईल. कारण केंद्रीय पातळीवर दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली जाते असे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले. दै.सामनाने याबाबतचे वृत्त मंगळवारी सकाळीच प्रसिद्ध केलं होतं, हे वृत्त खालीलप्रमाणे आहे.

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर होणार!

आपली प्रतिक्रिया द्या