आणखी दोन ड्रग्ज पेडलरना अटक

297

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ड्रग्जप्रकरणी क्रिस कोस्टा आणि सूर्यदीप मेहरोत्राला अटक केली. ते दोघेही एनसीबी कोठडीत आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी ड्रग्ज लिंक समोर आल्यावर एनसीबीने मुंबई आणि गोव्यात छापे मारले. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबीच्या पथकाने गोव्यात कारवाई केली. एनसीबीने क्रिसची चौकशी केली. क्रिस हा अनुजला ड्रग्ज पुरवत असायचा. तर ड्रग्ज प्रकरणात सूर्यदीप मेहरोत्राची एनसीबीने काही तास चौकशी केल्यावर त्याला अटक केली. सूर्यदीप हा रिया, शौविकच्या संपर्कात होता. तो करमजीत सिंग उर्फ के. जे. कडून ड्रग्ज विकत घेत असायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे. एनसीबीने के. जे. कडून एक महागडी गाडी जप्त केली आहे. के. जे. ने ती गाडी चार महिन्यापूर्की विकत घेतली होती. मंगळवारी एनसीबीने क्रिस आणि सूर्यदीपला अटक करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले. एनसीबीच्या वतीने विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी क्रिस आणि सूर्यदीपच्या एनसीबी कोठडीची न्यायालयात विनंती केली. न्यायालयाने त्या दोघांना एनसीबी कोठडी सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या