धक्कादायक! लहान भावासमोरच ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

14

सामना ऑनलाईन । सूरजपुर

बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच सूरजपुरमध्ये लहान भावासमोर ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या बाहेर खेळणाऱ्या मुलीला १० रूपयाची नोट दाखवून आरोपीने तिला आपल्या खोलीत बोलावून घेत हे दुष्कृत्य केलं. शेजारी राहणाऱ्या लोकांना जेव्हा लहान मुलीवर बलात्कार झाल्याचं समजलं तेव्हा त्यांनी आरोपीला बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो एका ठिकाणी शिपाई म्हणून कार्यरत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून तिची आई कामासाठी घराबाहेर असते. आरोपी हा पीडित मुलीच्या मामाच्या घराशेजारी राहतो. मुलगी आपल्या मामाकडे गेली असताना आरोपीने तिला पैशाचे अमिष दाखवत तिच्या छोट्या भावासमोरच तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारीही तिच्या मदतीली धावून आले. मात्र आरोपीने त्यांना देखील धमकवायला सुरुवात केली. त्यावेळी शेजाऱ्यांनी घरमालकाला बोलावून घराचं दार उघडलं. त्यावेळी पीडित मुलगी आणि तिच्या भावाची त्याच्या तावडीतून सुटका केली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या