…त्याने रस्त्यातच बाइक थांबवली आणि झोपून गेला; गुन्हा दाखल

वाहतुकीचे नियम मोडणारे अनेक वाहनचालक असतात. वाहतुकीचे नियम मोडल्याने त्यांना दंडही करण्यात येतो. मात्र, हैदाराबदमधील एका वर्दळीच्या रस्त्यावर एक तरुणाने अचानक बाइक थांबवली आणि तो झोपून गेला. वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये ही घटना बघितल्याने अपघात टळला आहे.

हैदराबादमधील वाहतूक पोलिसांना माधापूरच्या आयटी कॉरिडोरमध्ये वर्दळीच्या रस्त्यावर एक तरुण बाइकवरच झोपलेला दिसला. तो अस्वस्थ असल्याचे त्याच्या प्रकृतीवरून दिसूनयेत होते. त्याने मद्यपान केले असावे असा संशय पोलिसांना आला.

एक तरुण आयकेईए जवळील रस्त्यावर त्याच्या होंडा अ‍ॅक्टिव्हावर झोपलेला आढळल्याचे सायबराबाद ट्रॅफिक पोलिसांनी सांगितले. सत्यनारायण हा एका कार्यालयात शिपाई म्हणून काम करतो. तो मंगळवारी गच्चीबोवली येथील बँकेतून घरी परतत होता. त्याला अवस्थ वाटू लागल्याने त्याने दुचाकी रस्त्यालगत उभी केली आणि तो दुचाकीवरच झोपला.

सायबराबाद वाहतूक नियंत्रण विभागाला सीसीटीव्हीवर एक तरुण वर्दळीच्या रस्त्यावर बाईकवरच झोपल्याचे दिसले. वाहतूक विभागाने याबाबत संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देत सतर्क केले. तो मद्यधुंद असल्याचा संशय वाहतूक पोलिसांना आला. त्या अवस्थेत त्याने गाडी सुरू केल्यास अपघाताची शक्यता होती किंवा तो बाईकवरच झोपून राहिला असता तरी त्याला धोका होता.

वाहतूक नियंत्रण कश्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांची तपासणी केली. त्यात त्याने मद्यापन केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर दारूच्या नशेत वाहन चालविणे आणि कागदपत्रांशिवाय वाहन चालवण्याच्या आरोपाखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या