दारुच्या नशेत टॅक्सीत बसला आणि तीन देश फिरुन आला

45

सामना ऑनलाईन । कोपनहेगन

नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी सर्वांचेच भन्नाट प्लॅन तयार असतात. भरपूर मद्यपान आणि भरपूर दंगा म्हणजे ३१ डिसेंबरची पार्टी हे समीकरण ठरलेले. परंतु नशेमध्ये नॉर्वेमधील एका तरुणाने भलताच घोळ घालून ठेवल्याचे समोर आले आहे. दारुच्या नशेत हा तरूण टॅक्सीत बसला आणि एक नव्हे, तर चक्क तीन देश फिरुन आला. जेव्हा हा तरुण भानावर आला त्यावेळी मात्र त्याची भंबेरी उडाली आणि त्याने बिल देण्यासही नकार दिला.

मद्यधुंद अवस्थेत या तरुणाने कोपनहेगन (डेन्मार्क) शहरातून ओस्लोमधील (नॉर्वे) आपल्या घरी परतण्यासाठी टॅक्सी पकडली. त्यावेळी तो पुर्णपणे दारुच्या नशेत होता. कोपनहेगनपासून त्याचे घर ६०० किलोमीटर लांब होते. या संपूर्ण प्रवासाचे भाडे २ हजार २०० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच हिंदुस्थानी चलनात जवळपास १ लाख ३९ हजारांपेक्षा अधिक झाले. नशेत हा तरुण डेन्मार्कमधील कोपनहेगन येथून निघाला आणि स्वीडनमार्गे अखेर नॉर्वेत ओस्लोमध्ये स्वतःच्या घराजवळ पोहोचला. त्यानंतर मात्र या तरुणाने चालकाला पैसे देण्यास नकार देत झोपून घेतले.

एवढी मोठी रक्कम असल्याने चालकाने थेट ओस्लो पोलिसांना फोन करून घडलेला सारा प्रकार सांगितला. पोलीस आल्यानंतर तरुणाने चालकाचे पैसे देतो, असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या