दारुच्या नशेत पोलिसाने वृद्ध महिलेच्या अंगावरून नेली गाडी, पाहा हा भयंकर व्हिडीओ

दिल्लीत एका पोलिसाने दारुच्या नशेत गाडी चालवत एका वृद्ध महिलेच्या अंगावरून गाडी नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सदर महिलेला धडक दिल्याचे समजून देखील त्या पोलिसवाल्याने गाडी थांबवली नाही. त्यानंतरही तो त्या महिलेला चिरडून पुढे गेला. पूर्व दिल्लीतील चिल्ला गावात हा प्रकार घडला असून याप्रकरणी योगेंद्र नावाच्या पोलिसाला अटक करण्यात आली आहे. या घटनेत सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

योगेंद्र हे दारूच्या नशेत गाडी चालवत असताना त्यांच्या गाडीने एका महिलेला धडक दिली. त्यावेळी आजुबाजुचे लोकं त्या महिलेला उचलायला पुढे आले मात्र आपल्याला अटक होईल या भीतिने योगेंद्र यांनी थांबवलेली गाडी पुन्हा सुरू केली व त्या महिलेला चिरडून ते पुढे गेले. मात्र पुढे काही लोकांनी त्या पोलिसाला अडवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. योगेंद्र हा पोलीस निरीक्षक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या