मद्यधुंद पत्नीने झोपलेल्या पतीवर टाकले उकळते तेल

32

>>ब्रिजमोहन पाटील । पुणे

पती मुंबईवरून पुण्यात पत्नीला भेटायला आल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्यामुळे संतापलेल्या मद्यधुंद पत्नीने झोपलेल्या पतीवर चक्क उकळते टाकल्याची घटना वानवडी येथे घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पत्नीला अटक केली. भरत अर्जुनराम शेरसियसा (वय २६) असे जखमी पतीचे नाव आहे. पत्नी जया भरत शेरसिया (वय ३८) हिला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत हा मुंबईला चेंबुर येथे एका मोबाईलच्या दुकानात काम करतो. तर जया ही पुण्यात वानवडी येथील सिक्रेट टाऊन येथे राहाते. या दोघांची २०११ मध्ये पुणे-मुंबई प्रवासामध्ये रेल्वेत ओळख झाल्यानंतर त्याचे प्रमात रूपांतर झाले. त्यांनी काही महिन्यांपूर्वी कोर्टमॅरेज केले.

महिन्यातून एक दोन वेळेस तो पुण्यात तिला भेटायला येतो. शनिवारी तो पुण्यात आल्यानंतर रात्री त्यांनी घरामध्ये भरपूर दारू पिली. गप्पा मारत बसलेले असताना त्यांच्यामध्ये आचानक वाद सुरू झाला. त्यानंतर भरत हा झोपी गेला. परंतू, चिडलेल्या जयाने स्वयपाक घरात जाऊन गँसवर तेल गरम करून ते उकळत तेल त्याच्या अंगावर टाकले. शरीर भाजल्याने जोरात ओरडत भरतने शेजाऱ्यांना मदत मागितली, परंतू, त्याला मदत मिळाली नाही. शेवटी तिच्या तावडीतून सुटका करून घेऊन घरातून बाहेर आला. अँटोरिक्षा पकडून रुग्णालयात गेला. यामध्ये भरतीची पाठ आणि पोट १० टक्के भाजले आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. जयाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक हंचाटे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या