डीएसकेसह ३ बिल्डरच्या मालमत्तांची चौकशी

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

ठरलेल्या वेळेत गृहप्रकल्पांतील घरांचा ताबा न दिल्याने डीएसके ग्रुप, भगतानी आणि टेम्पल रोझ ग्रुप या बांधकाम कंपन्यांच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. ज्या बिल्डरांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत ते सर्वजण प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम करतात.

वेळेत घरांचा ताबा मिळाला नाही म्हणून काही ग्राहकांनी संबंधित बिल्डरविरोधात पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या