दुबईच्या राजकुमारीचे सुरक्षा रक्षकासोबत विवाहबाह्य संबंध, तोंड बंद ठेवण्यासाठी दिले 12 कोटी

दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची राजकुमारी पत्नी हया हिचे आपल्या सुरक्षा रक्षकासोबत अनैतिक संबंध होते. राजकुमारी हयाने याबाबत कोणाकडेही वाच्यता न करण्यासाठी त्याला 12 कोटी रुपये देखील दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. ब्रिटनच्या न्यायालयात सुरू असलेल्या एका सुनावणीच्या आधारे ‘डेली मेल’ने याबाबत वृत्त दिले आहे.

शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी राजकुमारी हया हिला 2019 मध्ये तलाक दिला होता. राजकुमारी हिला काहीही न सांगता शरिया कायद्याद्वारे त्यांनी तिला तलाक दिला होता. राजकुमारी हया हिचे ज्या सुरक्षा रक्षकासोबत अनैतिक संबंधा होते त्याचेही लग्न झालेले होते. मात्र राजकुमारीशी सुरू असलेल्या गुटरगुमुळे त्याचेही लग्न मोडले.

दरम्यान, राजकुमारी हया हिने दुबईला रामराम केला असून सध्या ती ब्रिटनमध्ये राहते. मुलांचा ताबा मिळवण्यासाठी तिने ब्रिटनच्या न्यायायलात धाव गजेतळज होती. नुकताच यावर निर्णय झाला आणि निकाल राजकुमारीच्या बाजूने देण्यात आला.

screenshot_2020-11-21-16-29-07-452_com-android-chrome

गप्प राहण्यासाठी दिले पैसे

राजकुमारी हया हिने तोंड गप्प ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक रसेल फ्लोव्हर याला पैसे आणि महागडे गिफ्ट देखील दिले होते. यात 12 लाखांचे घड्याळ आणि 50 लाखांच्या बंदुकीचाही समावेश आहे. दोघांमध्ये जवळपास 2 वर्ष हे संबंध होते.

सहावी पत्नी

राजकुमारी हया शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची सहावी आणि सर्वात कमी वयाची पत्नी होती. मात्र 2016 मध्ये तिचे आणि सुरक्षा रक्षकाचे अफेअर सुरू झाले. 2018 मध्ये तिने दुबई सोडली आणि लंडन गाठले.

आपली प्रतिक्रिया द्या