दुबई ओपन फायनलमध्ये कडव्या संघर्षानंतर सिंधूचा पराभव

सामना ऑनलाईन । दुबई

दुबई सुपर सिरिज स्पर्धेच्या फायनलमध्ये हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू हिला पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम सामन्यात कडव्या संघर्षानंतर सिंधूचा जपानची खेळाडू अकाने यामागुची हिने २१-१५, १२-२१ आणि १९-२१ असा पराभव केला.

उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूने चिनच्या चेन युफेचा २१-१५, २१-१८ असा सरळ सेटमध्ये पराभव करत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला होता.

याआधी स्पर्धेत अ गटातून खेळताना रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सिंधूने जपानच्या अकाने यामागुची हिचा २१-९ आणि २१-१३ असा पराभव केला होता. मात्र अंतिम सामन्यात सिंधूला विजयाची पुनरावृत्ती करता आली नाही.