वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

35

सामना प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंडवडमधील विजयनगर येथे वीजेचा धक्का लागून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मल्हारी बाबुराव शिरसाठ (४५) असे वीजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. शिरसाठ यांची पत्नी घराजवळील तारेवर कपडे वाळत टाकत असताना अचानक त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्या जोरात ओरडल्या. त्यांना वाचविण्यासाठी शिरसाठ धावले. मात्र पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात मल्हारी यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या