मनासारखा नवरा नाही म्हणून महिलेची मुलीसह आत्महत्या

35

सामना ऑनलाईन । हैदराबाद

तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुंदीगल इथे राहणाऱ्या महिलेने योग्य नवरा न मिळाल्यामुळे आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा मनासारखा न मिळाल्यामुळे तसेच चांगली नोकरी नसल्यामुळे महिला मागील काही दिवसांपासून तणावात होती.

पोलिसांना घटनास्थळी आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी देखील सापडली आहे. यामध्ये महिलेने योग्य पती आणि योग्य नोकरी नसल्याचं म्हटलं आहे. या महिलेने एमबीएचे शिक्षण घेतले होते. तर तिच्या पतीने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असून ते सध्या एका ठिकाणी नोकरी करत आहेत. मनासारखा जोडीदार न मिळाल्यामुळे ती काही दिवसांपासून तणावात होती. मागच्या काही दिवसांपासून घर चालवण्यासाठी पैशाची कमतरता भासत होती. त्यामुळेच मुलीचे भविष्य कसे असेल याची देखील महिलेला चिंता होती. याच तणावातून महिलेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचल्याचं पेलिसांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या