म्हणून अचानक सिगारेटचं व्यसन सुटलं!

37

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

सिगारेटच्या किंमतीत वाढ होताच सिगारेटच व्यसन असणाऱ्यांनी अचानक सिगारेट ओढणं सोडून दिल्याच एका संशोधनात आढळून आलं आहे. ‘एपिडेमोलॉजी’ या मासिकात याबद्दल माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अमेरिकेतील ड्रेक्सेल विद्यापीठातील संशोधकांनी सिगारेटच्या वाढत्या किंमती व सिगारेटचे व्यसन असलेल्या व्यक्ती यांच्यावर संशोधन केलं. या संशोधनाअंती सिगारेट स्वस्त असल्यास व्यसनी लोकांची संख्या जास्त असते याउलट सिगारेट महाग असल्यास ती सिगारेट न घेण्याचे प्रमाण जास्त असते असे आढळून आले. त्यामुळे व्यसनी सर्व सिगारेट महागल्यास व्यसनी लोकांचे प्रमाण कमी होईल, असा निष्कर्ष ड्रेक्सेन विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक अ‍ॅमे ऑचिनक्लोस यांनी काढला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या