​पर्यटकाच्या सिगारेटमुळे महाबळेश्वरमध्ये वणवा

सामना ऑनलाईन । महाबळेश्वर

पर्यटकाच्या सिगारेटमुळे वणवा पेटल्याची घटना महाबळेश्वर येथील लॉर्डविक पॉइंट येथे घडली आहे. यामध्ये परिसरातील पाच कि.मी. परिसरातील झाडेझुडपे जळून भस्मसात झाली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लॉर्डविक पॉइंट येथे बुधवारी दुपारच्या सुमारास पर्यटनास आलेला पर्यटक धूम्रपान करीत होता. धूम्रपानानंतर त्याने सिगारेटचे थोटूक खाली टाकले आणि यामुळे आग भडकल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तीर्व उतार व दरी असलेल्या या पॉइंटवर वन विभागाचे वनरक्षक रोहित लोहार व दीपक चोरट यांनी जिवाची बाजी लावून आग आटोक्यात आणली. सहायक वनसंरक्षक व्ही. व्ही. परळकर, वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड, वनपाल एस. बी. नाईक उपस्थित होते. याप्रकरणी वनास आग लावल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या