जेष्ठ शिवसैनिकांनी कष्ट केल्यामुळेच शिवसेनेला वैभवाचे दिवस!

146

सामना प्रतिनिधी । मंठा

ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिवसेना वाढविण्यासाठी आपले आयुष्य घालविले. एकनिष्ठ राहून पक्ष वाढविण्याची तळमळ तत्कालीन शिवसैनिकांची होती. त्यांनी कष्ट केल्यामुळेच शिवसेनेला वैभवाचे दिवस आले, असे गौरवोद्गार राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी मंठा येथे आयोजित कार्यक्रमात काढले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी मंठा येथे आयोजित केलेल्या शिवचरित्रकार तथा शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान व ज्येष्ठ शिवसैनिकांच्या सत्कार कार्यक्रमात राज्यमंत्री खोतकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नितीन बानगुडे पाटील, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, पंडितराव बोराडे, अंकुशराव अवचार, परतूर तालुकाप्रमुख बाबा तेलगड, बेबीताई पावसे, हिंमतराव सरकटे, ज्ञानेश्वर बोराडे, बालासाहेब बोराडे, हरिभाऊ चव्हाण, माऊली सरकटे, तुळशीराम कुहीरे, प्रा. माणिक थिटे, प्रा. डॉ. सदाशिव कमळकर यांची उपस्थिती होती.

राज्यमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून, चार वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. आता पाचव्या वर्षी खूप काही केल्याचा कांगावा करीत आहेत. ही शेतकऱ्यांची अवहेलना असून, बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी, असे होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी ज्येष्ठ शिवसैनिकांना एकत्र करून त्यांचा सत्कार केला. हा मोठा आनंदाचा क्षण मी मानतो, असे खोतकर यांनी सांगितले.

यावेळी बाजार समितीचे माजी संचालक अंकुशराव अवचार यांनी भाजपला लाथाडून शिवसेनेत प्रवेश केला. अजय अवचार, माऊली सरकटे, तुळशीराम कुहीरे, बंडूनाना मोरे यांचा शेकडो समर्थकांसह खोतकर व मान्यवरांनी सत्कार केला. शिवचरित्रकार प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी शिवसेनाप्रमुखांचे जीवनचरित्र आपल्या व्याख्यानातून उलगडले.

बानगुडे पाटील म्हणाले की, शिवसेनेचा जन्म संघर्षातून आणि संघर्षासाठी झालेला आहे. ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी झिजवले त्यांनी आता पक्षाचे सारथ्य करावे. शिवसेनेचा पराभव कोणीच करू शकत नाही, असे सांगून शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कोणतेही पद स्वतःकडे न घेता रिमोट आपल्या हातामध्ये ठेवला, याचे सविस्तर विश्लेषण आपल्या व्याख्यानात केले.

jalna-02

जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी आपल्या भाषणात ए.जे.बोराडे हे सामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारे नेते असून, त्यांच्याकडे कार्यकर्ते निर्माण करण्याचे कौशल्य आहे, असा उल्लेख करून या पंधरवड्यात चांगले उपक्रम राबविल्याचे सांगितले. रामायणात रामासोबत वानरसेना होती म्हणून रावणाचा वध झाला. महाभारतात कृष्णासोबत बाल-गोपाळ सवंगडी होते. वंâसाचा वध झाला. शिवाजी महाराजांसोबत मावळे होते म्हणून ते रयतेचे राजे झाले. त्याप्रमाणे शिवसेनाप्रमुखांसोबत सामान्य शिवसैनिक होते म्हणून शिवसेनेत सामान्य माणसाला न्याय मिळाला, असे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले. ए.जे.बोराडे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या सुख-दुःखात धावून जातात, असा आवर्जून उल्लेख आपल्या भाषणात केला.

जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाप्रमाणे जिल्हाभरात उपक्रम राबविले. मंठा शहरात ६ हजार रुग्णांची नेत्रतपासणी गणपती नेत्रालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्पâत करून जवळपास २५०० शस्त्रक्रिया व चष्म्यांचे वाटप करण्यात येणार असून, भविष्यातही सर्वसामान्य जनतेसाठी आपण दिवसरात्र काम करणार असे सांगितले आणि शिवसेनेचा झंझावात केवळ कडवट शिवसैनिकांमुळेच जिवंत असल्याचे ते म्हणाले. ज्येष्ठ शिवसैनिक प्रा. डॉ. सदाशिव कमळकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवसेना तालुकाप्रमुख प्रसाद बोराडे, माजी सभापती संतोष वरकड, शहरप्रमुख सचिन बोराडे, सुरेश सरोदे, प्रल्हादराव बोराडे, उपतालुकाप्रमुख संजय नागरे, बाबा राठोड, ज्ञानेश्वर सरकटे, जि.प. सदस्य संजय राठोड, मधुकर काकडे, उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे, वैजनाथ बोराडे, अरुण वाघमारे, निरज सोमाणी, नितीन राठोड, इलियास कुरेशी, बळीबापू अवचार, रामेश्वर शिंदे, दिगंबर बोराडे, कृष्णा खरात, दीपक बोराडे, भागवत चव्हाण, किरण सूर्यवंशी, अशोक घारे, सुभाष बोराडे यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिकांनी परिश्रम घेतले.

मंठा तालुक्यात भाजपला खिंडार
बाजार समितीचे माजी संचालक अंकुशराव अवचार यांनी पालकमंत्री लोणीकरांचे नेतृत्व झुगारून शेकडो समर्थक कार्यकत्र्यांसह राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते जाहीर प्रवेश केल्यामुळे भाजपाला तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे. त्यांच्यासोबत हरिभाऊ चव्हाण, तुळशीराम कुहीरे, भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अजय अवचार, प्रभाकर देशमुख, बंडूनाना मोरे, योगेश नाईक, पंढरीनाथ दवणे, गणेश चव्हाण, भागवत दवणे, नारायण दवणे, सतीश देशमुख, पिंटू कळणे, गणेश कळणे, संदीप अवचार, शिवाजी अवचार, प्रकाश कापसे, सतीश खवणे, अजय अवचार मित्रमंडळाच्या सर्व कार्यकत्र्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच तळणी येथील ज्ञानेश्वर सरकटे, भगवान सरकटे, वसंतराव शिराळे, गोविंदराव इक्कर, रामेश्वर जायभाये, तर रानमळा येथील रामप्रसाद बुधवंत, विनायक कांगणे, मल्हारी पालवे, अशोक कुटे, ईश्वर कांगणे, मनोहर कांगणे, अर्जुन टाकरस, शिवाजी जावळे, राजेभाऊ अवचार, तुकाराम खरात, प्रसाद खरात यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ग्रामीण भागात घराघरात पोहचवून ज्यांनी शिवसेनेत निष्ठेने काम केले व सदैव भगव्याचा मानसन्मान केला, अशा ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, पंडितराव भुतेकर यांनी केला. यावेळी हिंमतराव सरकटे, उद्धवराव खरात, बालासाहेब बोराडे, ज्ञानेश्वर माऊली, गणपत कुलकर्णी, प्रा. डॉ. सदाशिव कमळकर, जनार्धन मोरे, बी.के. गायकवाड, डॉ. उद्धवराव बोडखे, शिवाजी झोल, ईश्वर बरसाले, बापूराव घनवट, दशरथ गोरे आदींचा सत्कार करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या