समुद्री गाय दिवस अर्थात डुगॉन्ग दिन होणार साजरा

शीर्षक वाचून थोडे बुचकळ्यात पडला असाल ना? जमिनीवर चालणारी गाय ऐकली होती.. ही कुठली समुद्री गाय? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर 28 मे रोजी तुम्हाला मिळू शकेल.

कारण वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट इंडियातर्फे 28 मे 2020 रोजी डुगॉन्ग दिन साजरा केला जात आहे. डुगॉन्ग नावाच्या या दुर्मीळ प्राण्याचं अस्तित्व आज धोक्यात आलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टिने अतिशय उपयुक्त घटक असलेल्या या जीवाचं संवर्धन करणं गरजेचं असल्याने आणि सामान्य नागरिकांपर्यंत या प्राण्याचं महत्त्व पोहोचावं म्हणून हा दिन साजरा केला जातो. वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट इंडियातर्फे यंदा हा दिन सोशल मीडियाच्या माध्यमातून साजरा होणार आहे.

हा दहा दिवसांचा कार्यक्रम 19 मे 2020 रोजी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) सुरू झाला आहे आणि एक माहिती पोस्ट करून, डगॉन्गसचे महत्त्व, त्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याचे आणि त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं त्यांचं उद्दीष्ट आहे. देहरादून येथे वसलेली ही संस्था पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संशोधन केंद्र असून 2016 पासून गुजरात, तामिळनाडू आणि अंदमान बेटांवर हिंदुस्थानातील डुगॉन्गच्या संवर्धनाचं काम करत आहे आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून सामान्यांना डुगॉन्ग या प्राण्याविषयी जागरूक केले जात आहे. ही संस्था वन विभाग, सरकारी शाळा, पर्यटन संबंधित संस्था आणि मच्छीमार अशा अन्य सहभागी घटकांसोबत हा उपक्रम राबवते.

आपली प्रतिक्रिया द्या