सलमानच्या दुसऱ्या ‘ऐश्वर्या’चा हॉट लूक व्हायरल

2338

बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खान आणि जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांच्या नात्याच्या चर्चा अद्यापही होतात. दोघांमध्ये ब्रेकअप होऊन बराच काळ असून ऐश्वर्या रॉय आता बच्चन झाली आहे. तिला आता गोंडस मुलगीही आहे.

sneha-ullal3

ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर सलमानने एक चित्रपट बनवला होता. या चित्रपटाचे नाव ‘लकी – नो टाईम फॉर लव्ह’ होते आणि 1 एप्रिल 2005 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून सलमानने ऐश्वर्या रॉयसारख्या दिसणाऱ्या स्नेहा उल्लाल या अभिनेत्रीला लॉन्च केले होते.

sneha-ullal1

स्नेहाला त्या वेळी ऐश्वर्याची डुप्लिकेट बोलले जात होते. परंतु तिचा पहिलाच चित्रपट दणक्यात आपटला. यानंतरही तिने बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. परंतु एकही चित्रपट हिट होऊ शकला नाही. यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. या ठिकाणी तिने काही हिट चित्रपटही दिले.

sneha-ullal2

सध्या स्नेहा उल्लाल चित्रपटांपासून दूर आहे, परंतु सोशल मीडियावर सक्रीय आहे. इन्स्टाग्रावर स्नेहा नेहमीच आपले खास फोटो अपलोड करत असते. सध्या तिचा असाच एक काळ्या रंगातील एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. आपल्याला काळा रंग अधिक आवडतो म्हणून मी इन्स्टाग्रामवर काळ्या कपड्यातील फोटो शेअर करते, असेही ती म्हणाले.

sneha-ullal

आपली प्रतिक्रिया द्या