नागरे-पाटील टोळी ८५ कोटी बनावट नोटांची हेराफेरी करणार होती

80

नाशिक – एक कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटांप्रकरणी अटकेत असलेला छबू नागरे, रामराव पाटील व टोळी तब्बल ८५ कोटींच्या बनावट नोटांची हेराफेरी करणार होती, अशी धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. यामुळे पोलीस यंत्रणाही हादरून गेली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष छबू नागरे, बहुचर्चीत ठेकेदार रामराव पाटील याच्यासह अकराजणांना शहर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. या टोळीचा मुख्य सूत्रधार नागरे याच्या खुटवडनगर येथील घरातील ब्युटी पार्लरमधून दोन प्रिंटर, स्कॅनर, शाई हस्तगत करण्यात आली आहे. चलनातून बाद करण्यात आलेल्या हजार व पाचशेच्या कितीही नोटा छापण्याची तयारी नागरे टोळीची होती. एका पार्टीला त्यांनी ८५ कोटींची ही बनावट रक्कम देण्याची तयारी दर्शविली होती. त्याचाच पहिला टप्पा म्हणून एक कोटी ३५ लाख रुपयांच्या हेराफेरीवेळीच त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी आणखी किती जणांना फसविले आहे आणि केव्हापासून बनावट नोटांची छपाई सुरू होती, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.

– See more at: https://www.saamana.com/uttar_maharashtra/nagre-patil-toli#sthash.AOySF5Ql.dpuf

आपली प्रतिक्रिया द्या