विजयादशमीनिमित्त देशभरात उत्साहाचे आणि चैत्यन्याचे वातावरण असते. ठिकठिकाणी रावणाचा भव्य पुतळा उभारून त्याचे सामूहिक दहन केले जाते. मात्र उत्तर प्रदेशात एका महिलेने दसऱ्याला चक्क पती, सासू-सासरे आणि नणंदेचा पुतळा जाळला आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.
सदर घटना उत्तर प्रदेशातील हमीपूरमध्ये घडली आहे. एका महिलने दसऱ्याचे औचित्य साधत पती, सासू-सासरे आणि नणंदेच्या पुतळ्याचे दहन केले आहे. तिच्या मते तिच्या सासरचे सर्वजण रावणाच्या वृत्तीचे आहेत. तसेच या सर्वांनी मिळून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पतीचे मागील 14 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध आहेत. विशेष म्हणजे पतीला त्याच्या कुटुंबीयांचा पाठींबा आहे. हाच राग मनात ठेवत महिलेने सासरच्या घरासमोरचं पती, सासू-सासरे आणि नणंद यांचा प्रतिकात्मक पुतळा उभा केला आणि त्याचे दहन केले.