नक्षलग्रस्त भागातील ड्युटी नाकारली; दोन जवानांना अटक

30

सामना ऑनलाईन । गडचिरोली

नक्षलग्रस्त भागात निवडणूक बंदोबस्तासाठी जाण्यास नकार दिल्याबद्दल राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन जवानांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेजण सहाय्यक फौजदार पदावर काम करीत आहेत.

गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात निवडणूक बंदोबस्तासाठी या दोघांची ड्युटी लावण्यात आली होती. मात्र, त्यांनी तिथे जाण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर एसआरपीएफ कायद्याच्या कलम १४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआरपीएफच्या ४ नंबरच्या तुकडीत असलेल्या या दोन जवानांची नावे  मोहनचंद पांडे आणि ओमप्रकाश लांजेवर अशी आहेत. नागपूर एमआयडीसी पोलिसांनी या दोघांना ड्यूटी नाकारल्याबद्दल अटक केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या