दगडालाही पाझर फुटला…रॉक बाप झाला

51

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क

डब्ल्यू.डब्ल्यू.एफ.मुळे घराघरात पोहोचलेला आणि हॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवणारा ड्वेन जॉन्सन उर्फ द रॉक बाप झाला आहे. ड्वेनने फेसबुकवर पोस्ट टाकत कन्या रत्न झाल्याची बातमी सगळ्यांना दिली आहे. हॉस्पीटलमधला मुलीसोबतचा फोटो त्याने शेअर केला असून त्यासोबत त्याने भावून संदेशही लिहला आहे.

“जन्मापासून मी कणखर पण प्रेमळ महिलांच्या सहवासात वाढलो आहे, मात्र माझी मुलगी टीयाच्या प्रसुतीच्या वेळी पत्नी लॉरेन हाशियानच्यासोबत राहील्याने माझं तिच्यावरील प्रेम आणि महिलांबद्दलचा आदर आणखी वाढला आहे. मी माझ्या सगळ्यात छोट्या मुलीला वचन देतो की तिचं आयुष्यभर रक्षण करेन, सांभाळ करेन , मार्गदर्शन करेन आणि आयुष्यभर हसत ठेवीन. माझ्या डोक्यावर जबाबदाऱ्यांच्या अनेक टोप्या आहेत मात्र ‘बाप’ झाल्याची ही टोपी ही माझ्यासाठी सर्वात अभिमानाची असेल ” अशा शब्दात ड्वेन जॉन्सने त्याच्या मुलीचे स्वागत केले आहे. ड्वेन जॉन्सनला सिमॉन अलेक्झांड्रा आणि जॅस्मिन लिया या दोन मुली आहेत. टीयाचं घरी आगमन झाल्याने तो अत्यंत खूश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या