IPL 2020 -चेन्नई सुपरकिंग्सला आणखी एक धक्का, अष्टपैलू खेळाडू आय़पीएल बाहेर

चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या मागची शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाहीए. आयपीएलमध्ये खराब कामगिरी केल्य़ानंतर आता संघातील एक दिग्गज खेळाडू जखमी झाल्याने संघाबाहेर गेला आहे.bravo0

 

ड्वेन ब्राव्हो असे त्या खेळाडूचे नाव असून त्याच्या जाण्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. 37 वर्षाचे ड्वेन ब्राव्हो संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. मात्र 17 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात झालेल्या सामन्यात गोलंदाजी करू शकला नव्हता.

ब्राव्हो सुपर किंग्जकडून आतापर्यंत सहा मॅच खेळला असून दोन सामन्यात फक्त सात धावा करू शकला आहे. तर सहा विकेटसह 8.58 च्या रनरेटने गोलंदाजी केली आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज ने आतापर्यंत दहा पैकी सात सामने हरले आहेत. त्यामुळे संघ प्ले ऑफच्या बाहेर पडला आहे. तर गुणतालिकेत संघ शेवटच्या स्थानावर आहे.

यंदा सुरेश रैना, हरभजन सिंग या दिग्गज खेळाडूंनी माघार घेतल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या