नवी मुंबईत रंगणार फिफा वर्ल्ड कपचा अंतिम सामना; महिलांच्या 17 वर्षांखालील स्पर्धेचा बिगुल वाजला

222

17 वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल वर्ल्ड कपचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता अखिल हिंदुस्थानी फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) 17 वर्षांखालील महिलांच्या फुटबॉल वर्ल्ड कपसाठी सज्ज झाले आहे. नवी दिल्लीमध्ये याची अधिकृत घोषणा करण्यात आली. 2 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणाऱया या स्पर्धेचा पहिला सामना गुवाहाटीच्या इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर तर जेतेपदाचा फैसला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे.

एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व फिफाचे सराई बॅरेमन यांच्या उपस्थितीत हिंदुस्थानात आगामी महिन्यांत खेळवण्यात येणाऱया स्पर्धेचा बिगुल वाजला. या स्पर्धेच्या लढती नवी मुंबई, भुवनेश्वर, अहमदाबाद, गुवाहाटी व कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहेत. 12 व 13 नोव्हेंबरला उपांत्यपूर्व तर 17 नोव्हेंबरला उपांत्य फेरीच्या लढती होतील.

आपली प्रतिक्रिया द्या