वाढती वाहन संख्या

432

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<<

गेल्या दोन आठवडय़ांपूर्वी दिल्ली शहराच्या वायुप्रदूषणाचा प्रश्न जटील बनला होता. प्रदूषणामुळे सारे शहर धुकेमय झाले होते. हवाई सेवा, रेल्वे, रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी द्यावी लागली. दिल्ली शहराच्या बाहेरील जमिनी शेतकऱ्यांना सालाबादप्रमाणे तापविण्याची प्रक्रिया (राब) करावी लागते. त्यामुळे धुके होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी खरा प्रदूषणाचा धोका शहरात वाढत चाललेल्या मोटर संख्येमुळे होत आहे. धूर व ध्वनिप्रदूषणाची उच्चतम पातळी वाढली आहे. २००५-०६ मध्ये दिल्लीमध्ये ४८ लाख ३० हजार १३६ वाहने वाढून २०१५-१६ मध्ये ९७ लाख ०४ हजार ७४१ वाहने झालेली आहेत. हा वाढता क्रम पुढे चालूच आहे. म्हणजे लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक वाहनांची संख्या झालेली आहे. दिल्लीसारखीच देशातील बहुतेक शहरांमध्ये तेथील लोकसंख्येच्या वाढीबरोबर वाहन संख्याही त्या प्रमाणात वाढत आहे. आज आपला देश परदेशी बनावटीच्या मोटारींची मोठी बाजारपेठ बनला आहे. विदेशी मोटार उत्पादक कंपन्या दरवर्षी हिंदुस्थानातील अब्जावधी रुपये घेऊन जातात. सध्याची आर्थिक नीती अशीच परधार्जिणी झालेली आहे. देशाचे आर्थिक धोरण ठरविणारे परदेशी भांडवलदारांच्या हातचे बाहुले बनले आहते. हे लोक स्वतःच्या मुलांना परदेशात नोकरी, मोठी शिष्यवृत्ती आणि आलिशान सोयीसवलतीसाठी देशाच्या संपत्तीशी सौदेबाजी करतात. आज कार घेण्यासाठी सहजपणे कर्ज मिळते. मोटारीच्या वाढत्या संख्येच्या विस्फोटाला वेळीच नियंत्रित केले पाहिजे. दिल्लीसह सर्वच मोठय़ा शहरांमधील वाढती वाहन संख्या आपमतलबी कारभारी मंडळींकडून होत असावी हे स्पष्ट दिसते.

आपली प्रतिक्रिया द्या