‘सूर्यप्रभा’ची ई-बुक आवृत्ती

डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांचे समग्र जीवनकार्य आणि त्यातील संस्मरणीय आठवणी सचित्र कथन करणाऱया ‘सूर्यप्रभा’ या ग्रंथाची ई-बुक आवृत्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित होणार आहे. पुस्तक मार्पेट प्रकाशनच्या वतीने डॉ. मिलिंद कसबे यांनी ही घोषणा केली.

ग्रंथाचे संपादन ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी केले आहे. ग्रंथाचे प्रकाशन रविवार, 3 डिसेंबरला भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते संध्याकाळी 4 वाजता दादरच्या डॉ. आंबेडकर भवनात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ पँथर-रिपब्लिकन नेते, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, साहित्यिक अर्जुन डांगळे, प्राचार्य रमेश जाधव, प्रा. एकनाथ जाधव, प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, सतीश डोंगरे, अॅड. जयमंगल धनराज प्रमुख पाहुणे आहेत. दरम्यान, हिंदी भाषेतील अनुवादित आवृत्तीही प्रकाशनाच्या वाटेवर असून इंदूरचे डॉ. अनिल गजभिये यांनी अनुवाद केला आहे.