![earthquake-1](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/03/earthquake-1-696x447.jpg)
मराठवाड्याच्या नांदेड, हिंगोली, वसमतसह छत्रपती संभाजीनगरात आज सकाळी 7:15 च्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.नांदेड आणि हिंगोलीत भूकंपाची तीव्रता अधिक असल्याची माहिती मिळत आहे. रिश्टर स्केलवर 4.0 इतक्या तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले आहेत. नांदेड आणि हिंगोलीतील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर जीव वाचवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर धाव घेतली. सुदैवानं अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.