जम्मू कश्मीरनंतर लडाखलाही भूंकपाचे धक्के; 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

earthquake-measuring

जम्मू कश्मीरला गुरुवारी दुपारी 1.11 वाजता भूकंपाचे सहा धक्के जाणवले. त्यानंतर लडाखही भूकंपाच्या धक्क्याने हादरले. लडाखला 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. कारगिल, भद्रवाह, किश्तवाड आणि कटारामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूंकपात जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

जम्मू कश्मीरला याआधी मंगळवारीही भूकंपाचे धक्के बसले होते. त्याची तीव्रता 4.0 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली. गेल्या 19 दिवसात सातव्यांदा जम्मू कश्मीरला भूंकपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जम्मू कश्मीरला गुरुवारी दुपारी 1.11 वाजता बसलेल्या भूकंपाची तीव्रता 3.6 होती. या भागात काही वेळातच सहावेळा भूकंपाचे धक्के जाणावले. तर लडाखला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल होती. तर भूंकपाचा केंद्रबिंदू कारगिलपासून 119 किलोमीटर वायव्येला होता. तर कटराच्या काही भागात दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

जम्मू कश्मीरला महिन्याभरात भूकंपाचे सात धक्के जाणवले आहेत. तर देशभरात विविध ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राजधानी नवी दिल्ली, ईशान्य हिंदुस्थान, उत्तर हिंदुस्थान, अंदमान, निकोबार, गुजरात या भागांना महिन्याभरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. महिन्याभरात देशात 11 भूकंपाचे धक्के बसले आहेत. हिमालयाच्या क्षेत्राच जमिनीखाली प्रंड हालचाल होत असल्याने भूकंपाचे धक्के बसल्याचे संशोधकांनी सांगितले. तसेच हे भूकंप एखाद्या मोठ्या भूकंपाचे संकेत असल्याचा इशाराही संशोधकांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या