Philippines Earthquake: फिलिपाइन्समध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; मोठं नुकसान होण्याची शक्यता

दक्षिण फिलिपाइन्समध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.0 एवढी आहे. भूकंपानंतर अधिकार्‍यांनी आफ्टरशॉकचा इशारा दिला. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू मिंडानाओ बेटावरील दावो दे ओरो या पर्वतीय प्रांतातील मरागुसन नगरपालिकेपासून काही किलोमीटर अंतरावर होता.

यापूर्वी 16 फेब्रुवारीला मस्बेट परिसरात 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. मात्र यामध्ये कोणत्याही नुकसानीची पुष्टी झालेली नाही. मंगळवारच्या भूकंपात अद्याप कोणतीही हानी झालेली नाही. मात्र, ग्रामीण भागातही तपास सुरू आहे. लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. फिलिपाइन्स पॅसिफिकमध्ये रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. भूकंपाच्या दृष्टीने हे ठिकाण अत्यंत संवेदनशील मानले जाते.

तुर्की-सीरियातील भूकंपात सुमारे 48 हजारांचा मृत्यू झाला

तुर्की आणि सीरियामध्ये अवघ्या महिन्याभरापूर्वी झालेल्या भूकंपात 47,000 हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा भूकंप तुर्की आणि सीरियामधील सर्वात मोठ्या भूकंपांपैकी एक होता. भूकंपानंतर जगभरातील देश तुर्की आणि सीरियाच्या मदतीसाठी पुढे आले. हिंदुस्थानने दोन्ही देशांच्या मदतीने एनडीआरएफसह पॅरामेडिकल फोर्सही पाठवले होते. ऑपरेशन दोस्त अंतर्गत देशाने या देशांना मदत सामग्रीही पाठवली होती.