हे खा… गोरे व्हा…

बदामात सेलेनियम आणि झिंक असते. रोज ३ ते ४ बदाम खाल्ल्याने पिंपल्स जातात. त्वचा मुलायम आणि उजळ होते.

केळ्यात व्हिटॅमीन-ए, बी आणि ई भरपूर असते. ती नियमित खाल्ल्यास त्वचा नेहमी तरुण राहते आणि ती चमकदार होते.

टोमॅटोमध्ये असलेले लायकोपिन त्वचेला उजळ बनवते. शिवाय टोमॅटोमुळे वजन कमी व्हायलाही मदत होते.

ग्रीन टी त्वचेवरील डाग दूर करते. याबरोबरच त्वचेवरील टॅनिंग दूर करून ती मुलायम बनवते.

टोफू आणि सोया मिल्क अशा सोया उत्पादनांमध्ये असलेल्या ऍण्टी ऑक्सिडंट घटकांमुळे त्वचा तरुण दिसते. ती चमकदारही होते.

चहामध्ये आढळणारे ऍण्टी ऑक्सिडंट्स शरीरातील घातक पॅरॉक्साइडचा प्रभाव कमी करायला मदत करतात. चहामुळे त्वचा उजळही होते.

लिंबूपाण्यात असलेले व्हिटॅमीन-सी आणि ऍसिड्स त्वचेला ब्लीच करून उजळ बनवतात. त्यामुळे हे पाणी नियमित प्यायल्यास डोळ्यांखालील काळ्या डागांची समस्या दूर होते.

पालकमध्ये लोह आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे आठवडय़ातून किमान दोनवेळा तरी पालक खायला हवे. पालकचा ज्यूस प्यायला तरी चालेल. यामुळे पिंपल्स होणार नाहीत आणि त्वचा उजळ होईल.

बडीशेपमध्ये ऍण्टी ऑक्सिडंट्स भरपूर असतात. शरीरातील विषाक्त पदार्थ टाकून शरीर डिटॉक्सीफाय करते. यामुळे रक्ताभिसरण ठीक होते.