पावसाळ्यातही फिट राहायचे ? मग हे पदार्थ खाणे टाळा

1794

सामना ऑनलाइन | मुंबई 

पावसाळ्याच्या दिवसात मन खूप उत्साही असते. या दिवसात पावसात भिजायला बाहेरचे गरम, चटपटीत पदार्थ खायला खूप छान वाटतात. पण या पदार्थांतून संसर्गजन्य आजार होऊ शकतो. यामुळे पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

पावसाळयाच्या दिवसात पाणीपुरी, भेळपुरी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. पण हे पदार्थ या दिवसात खाणे म्हणजे आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे कारण हे पदार्थ शरीरासाठी हानीकारक असतात.ap2हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी चांगल्या असतात. मात्र कोबी, पालक, फ्लॅावर यांसारख्या पालेभाज्या खाणे टाळा. कारण पावसाळ्यात पालेभाज्यामध्ये किडे-अळ्याचे येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

ap1तळलेले पदार्थ
या दिवसात रस्त्यावरील वडापाव, समोसा,गरमा गरम भजी खाण्याची इच्छा होते. पण या दिवसात तळलेल्या पदार्थाच्या सेवनामुळे पोटदुखी, अॅसिडिटी या समस्या उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्यात तळलेले पदार्थ न खाणेच योग्य.

ap3शिळे अन्न

पावसाळ्यामध्ये शिळे अन्न खाणे टाळावे. कारण आपण रात्री शिल्लक राहिलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतो आणि सकाळी उठून खातो. पण ६ तासाहून जास्तवेळ फ्रिजमध्ये ठेवलेल्या अन्नात शरीराला अपायकारक असलेले विषाणू वाढीस लागतात. यामुळे शिळे अन्न खाणे टाळावे.

ap4

फळाचे सेवन
फळ्यांच्या सेवनातून व्हिटामिन सी मिळतं. पण या दिवसात स्टॅालवर उघड्यावर असलेली फळे खाल्ल्याने आपण आजारी पडतो कारण स्टॅालवर जास्त वेळ कापून ठेवलेल्या फळांवर माशा येऊन बसतात त्या दूषित जागेवरून आल्याने त्यांच्या पायाला धूळ असल्याने बाहेरील फळे खाणे टाळावे.

आपली प्रतिक्रिया द्या