काळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का? वाचा…

काळा तांदूळ हा तांदळाचा एक प्रकार आहे. यात तंतुमय पदार्थ (फायबर), तसेच लोह व तांबे ह्या घटकांची मात्रा नेहमीच्या तांदुळापेक्षा अधिक असते. तसेच, उच्च गुणवत्तेचे वनस्पती प्रथिन असते. यात अँटिऑक्सिडंटची मात्राही अधिक असते. हा शिजविल्यानंतर गडद जांभळ्या रंगाचा भात होतो.

हिंदुस्थानात हा तांदूळ ईशान्येकडील राज्यांत विशेषतः मणिपूर येथे पिकविण्यात येतो. तसेच विदर्भातही याची लागवड सुरू झाली आहे.

या प्रकारच्या तांदुळाची लागवड पूर्वी चीनमधील राजघराण्यातल्या लोकांसाठी करण्यात येत असे. सामान्य चिनी माणसांना हा भात लावण्याची परवानगी नव्हती. यामुळे यास ‘फॉरबिडन राईस’ असे म्हणत असत. याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे याचा अनेक देशात प्रसार झाला. यात संशोधनानंतर, अनेक औषधी गुणधर्म आढळले आहेत.

काळ्या तांदळाचे 5 मोठे फायदे

1. लठ्ठपणा – अनेक लोकं लठ्ठपणा वाढू नये म्हणून भात खाणे टाळतात. अशा लोकांसाठी काळे तांदूळ फायदेशीर आहेत. कारण यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

2. हृदय – हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहे. यामधले फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात. ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.

3.पचन – काळे तांदूळमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात. जे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करतात. पचनसंबंधित तक्रारही यामुळे दूर होतात.

4. रोगप्रतिकार शक्ती – काळे तांदुळात एंथोसायनिन नामक अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळतात. जे कार्डियोवैस्कुलर आणि कर्करोग सारखे रोगांपासून बचाव करतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

5 अँटीऑक्सीडेंट – हे तांदुळ गडद रंगाचे आहेत. अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे यांचा रंग गडत असतो. जे आपल्या त्वचा, मेंदु आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. काळ्या तांदुळामध्ये जास्त अँँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपल्या डोळे आणि मेंदूसाठीही याचा उपयोग होतो. नियमित याचं सेवन केल्याने तुमची दृष्टी चांगली राखण्यास मदत होते.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना सुशील हस्तक यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या