अभिनेता सागर कारंडेला काय खायला आवडतं? वाचा सविस्तर

114

अभिनेता सागर कारंडे आठवडय़ातून एकदा तरी गाडीवरचा भुर्जीपाव खातोच.

खाणंया शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय ?  – ‘खाणं’ ही एक मौज आहे. ती छानपैकी लुटावी. तिचा अतिरेक करू नये. कुठल्याही खाण्याचा आस्वाद घेत खावं. केवळ जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी खाऊ नये. खाण्याचा आदर करावा.

खायला काय आवडतं– शाकाहारी पदार्थ खूप आवडतात. मांसाहारात फक्त तंदुरी पदार्थ खातो.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता – फिटनेसची काळजी घेण्याअंतर्गत व्यायाम, बॅडमिंटन, क्रिकेट असे खेळ खेळतो, पण आठवडय़ातला एक दिवस कशाचीही तमा न बाळगता जे हवं ते खातो. बाकीचे सहा दिवस फिटनेसची काळजी घेतो.

डाएट करता का– नाही, पण खाण्यावर नियंत्रण ठेवतो. कधी कधी खाणं जास्तही होतं आणि कधी कधी दिवसभर खात नाही. त्यामुळे दिवसभर उपाशी राहणे किंवा काहीही न खाणे टाळतो.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? – शूटिंगच्या वेळी रोज खातो, पण घरी असेन तेव्हा दोन वेळा बाहेरचं खातो.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – कांदिवलीत ‘कबोला’ हॉटेलमधले पदार्थ खूप आवडतात. तसेच भूर्जी पावच्या गाडीवर जाऊन भूर्जी पाव खायला आवडतो.  आठवडय़ातून एकदा तरी रस्त्यावरच्या गाडीवर आमलेट पाव, भूर्जी पाव खातो.

कोणतं पेय आवडतं? – अननसाचं सरबत.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणंपिणं कसं सांभाळता ? – सांभाळता येतच नाही. प्रयोगाच्या वेळा नेहमीच्या वेळांप्रमाणे नसतात. मुंबईबाहेरील प्रयोगांच्या वेळा निश्चित नसतात. त्यामुळे वेळ ठरलेली नसते. दौऱयाला गेल्यावर घरगुती जेवण शोधतो. त्यांना घरचंच जेवण बनवून आणायला सांगतो. घरी केलेलं चटणी, भाकरी, कांदा, झुणका असं साधं घरगुती जेवण करतो.

स्ट्रीट फूड आवडतं का? – हो. मला स्ट्रीट फूड लहानपणापासूनच आवडतं. पाणीपुरी, शेवपुरी खूपच आवडते.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – झुणका-भाकरी आवडते.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता?- माझी आई आणि पत्नी मटण उत्तम बनवते. त्यामुळे मटण खाऊ घालतो.

उपवास करता का?- नाही.

स्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपी ? – ऑमलेट आणि मॅगीव्यतिरिक्त मी काहीही बनवू शकत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या