‘आणि ग्रंथोपजीविये’ ई-बुकचे ठाण्यात प्रकाशन

कवी आणि चित्रकार रामदास खरे यांच्या नव्या पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन करण्यात आले. समीक्षक अरविंद दोडे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  हे पुस्तक ई-बुक स्वरुपातील आहे हे विशेष आहे.  प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दलचा परिचय त्या लेखकाचा जीवनप्रवास, विविध किस्से, पार्श्वभूमी या पुस्तकाद्वारे खरे यांनी वाचकांसमोर मांडली आहे.  पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजर असलेल्या लेखिका अस्मिता येंडे यांनी ‘या पुस्तकाच्या सहजसुंदर लेखनशैलीमुळे हे पुस्तक वाचताना वाचक रसिक त्यात नकळत गुंतत जातो’ असा अभिप्राय दिला. या छोटेखानी घरगुती स्वरूपाच्या कार्यक्रमाचे निवेदन कवयित्री, अनुवादक सुजाता राऊत यांनी अतिशय सुंदरपणे केले.  वाचन चळवळ वाढण्यासाठी ईबुक हा देखील उत्तम पर्याय असू शकतो यावर त्यांनी भर दिला. कवी, चित्रकार श्री रामदास खरे यांनी उपस्थितांचे, मान्यवरांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या