भाजप खासदार गजेंद्र शेखावत यांना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटिस

35

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आचारसंहिता लागू असून नेत्यांनी त्याचे पालन करणे गरजेचे असते. परंत काही वाचाळवीरांनी आचारसंहितेंचे सर्रास उल्लंघन केल्याने त्यांच्यावर निवडणुक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आयोगाने योगी आदित्यनाथ आणि मेनका गांधी यांना प्रचार करण्यास बंदी घातली आहे. तसेच बसपाच्या अध्यक्षा मायावतींवरही हीच कारवाई केली आहे. आता निवडणूक आयोगाने भाजपचे खासदार, उमेदवार आणि केंद्रिय राज्यमंत्री गजेंद्र शेखावत यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांना उलटं टांगेन असे शेखावत एका सभेत बोलले होते. अयोगाने याची दखल घेत, त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.

जोधपूरचे खासदार आणि केंद्रिय राज्यमंत्री शेखावत यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांनी धमकी दिली होती. एका सभेत ते म्हणाले होते की, “माझी ही निवडणूक काही शेवटची नाही. पाच वर्षानंतर सत्ता बदलेलच. प्रत्येक अधिकार्‍यांची कुंडली आहे माझ्याकडे.” पुन्हा सत्तेत आल्यास एकेकाला उलटं टांगेण अशी धमकीच त्यांनी अधिकार्‍यांना दिली होती. यावर निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या