कमलनाथ यांचे स्टार प्रचारकपद गेले, ‘आयटम’ बोल महागात पडले

काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना भाजपच्या महिला उमेदवाराला ‘आयटम’ म्हणणे चांगलेच महाग पडले आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत कमलनाथ यांना दिलेला स्टार प्रचारक दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी प्रचारात अशोभनीय भाषा वापरत निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत आयोगाने ही कारवाई केली.

आता मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत ज्या काँग्रेस उमेदवाराच्या मतदारसंघात कमलनाथ प्रचाराला येतील त्या सभेचा सर्व खर्च उमेदवाराच्या खात्यात धरला जाणार आहे. तो खर्च पक्षाच्या खात्यात दाखवता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या