हुश्श! पुढच्या वर्षी पगारवाढ, आशियातील नोकरदारांना दिलासा देणारा ईसीएचा अहवाल

कोरोनामुळे 2020 हे वर्ष सर्वांसाठी खडतर आहे. जगाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. कोट्यवधी लोकांचे रोजगार हिरावले गेलं. अनेकांच्या वेतनात कपात झाली. बऱयाच कंपन्यांनी पगारवाढ दिलेली नाही. त्यामुळे एकूणच नोकरदारांसाठी हे वर्ष त्रासदायकच राहिलं.

आता नोकरदाराचं लक्ष पुढील वर्षाकडे आहे. पुढच्या वर्षी तरी पगारवाढ होईल, अशी आशा आहे. याबाबत ईसीए इंटरनॅशनल या कन्सल्टंसी फर्मने दिलासादायक अहवाल प्रकाशित केला आहे. 2021 वर्ष आशिया खंडातील कर्मचाऱयांसाठी चांगले ठरेल, असा अंदाज ईसीए कन्सल्टन्सीने वर्तवला आहे.

ईसीए इंटरनॅशनलने 68 देशांतील 370 कंपन्यांमधील व्यवस्थापनांशी संपर्क साधून पगारवाढीसंदर्भातील अंदाज व्यक्त केला आहे. पुढच्या वर्षी अन्य देशांच्या तुलनेत आशिया खंडातील कर्मचाऱयांचा पगार जास्त वाढणार आहे. आशियातील कर्मचाऱयांच्या पगारवाढीची सरासरी गेल्यावर्षी 3.2 टक्के होती, ती 4.3 टक्के राहील, असे ईसीए इंटरनॅशनलने म्हटले आहे.

कोरोनाचे संकट असूनही आशिया खंडातील देशांची उत्पादकता वाढली असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम पगारवाढीवर दिसून येईल, असे अहवालात म्हटलंय.

इंडोनेशिया पहिल्या तर हिंदुस्थान आठव्या स्थानावर

पगारवाढीच्या यादीत हिंदुस्थान आठव्या क्रमांकावर आहे. हिंदुस्थानातील कर्मचाऱयांना 2.3 टक्के पगारवाढ मिळू शकेल, असा ईसीए इंटरनॅशनल अंदाज आहे. 2021 सालात इंडोनेशियातील कर्मचाऱयांना सर्वाधिक पगारवाढ मिळेल असा अंदाज आहे. इंडोनेशियातील कर्मचाऱयांना पुढील वर्षी सरासरी 3.8 टक्के पगारवाढ मिळू शकेल. 2020 मध्ये कर्मचाऱयांना सरासरी 2.6 टक्के पगारवाढ मिळाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या