फेक न्यूजवरून निवडणूक आयोगाने व्यक्त केला राग, तपासाचे दिले आदेश

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फेक न्यूजवरून निवडणूक आयोग नाराज असून दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना तपासाचे आदेश दिले आहे. तसेच पोलिसांनाही या प्रकरणी तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. अफवा रोखण्यासाठी संबंधित कायद्याअंतर्गत व्यक्ती आणि संस्थांविरोधात कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत.

या वर्षी लोकसभा निवडणूक येऊ घातल्या आहेत. त्यावर सोशल मीडियावर फेक न्यूज वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी आरोपींवर कारवाई करावी यासाठी निवडणूक आयोगाने अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या