अर्थव्यवस्थेबाबतच्या वादावर बोलणार नाही; मी माझे काम करतेय – निर्मला सीतारमण

598
nirmala

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत सर्वांनाच चिंता आहे. मी माझे काम करत आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्थेबाबत सुरू असलेल्या वादावर भाष्य करण्यास नकार दिला. अर्थव्यवस्थेची चिंता सर्वांनाच आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आपले कार्यालय सोडून सगळीकडे जीएसटी वाढीबाबतची चर्चा सुरू आहे. मात्र, जीएसटीमध्ये वाढ करण्याचा विचार नसल्याचे संकेत त्यांनी दिले.

जीएसटी समितीची बैठक 18 डिसेंबरला होणार आहे. सरकारचे उत्पन्न घटल्याने या बैठकीत जीएसटी वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, सरकारचा तसा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून कांद्याची आयात सुरू आहे. त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे दर खाली येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनीही अर्थव्यवस्थेबाबतची माहिती दिली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसत असल्याचे ते म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वाटचाल सुरू असून त्यासाठीची योजना आमच्याकडे तयार असल्याचेही सुब्रमण्यन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या