घरकुल घोटाळाप्रकरणी तत्कालीन जिल्हधिकारी सुनील चव्हाण यांनी ईडीची नोटीस

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणार्‍या घरकूलच्या जमिन घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली असतानाच यासाठी जमिन देत असताना सदर जमिनीची चौकशी न करताच जमिनी देण्यात आल्याचा ठपका ठेवून तत्कालीन जिल्हाधिकारी तथा राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीने नोटीस जारी केली आहे.

घरकुलासाठी जिल्ह्यातील पडेगाव, तीसगाव, सुंदरवाडी, हर्सूल आणि चिलकठाणा आदी ठिकणच्या शासकीय जमिनी देण्यात आल्या. या जमिनी देत असताना जिल्हा प्रशासनाने या जमिनी कशासाठी आहेत, याची शहनिशा करण्यात आली नाही. असा ठपका ठेवून तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची चौकशी करण्यासाठी ईडीने नोटीस जारी केल्याची चर्चा आहे. यासबंधी वृत्त आज बुधवारी विविध प्रसार माध्यमातून प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये घरकुलाचा घोटाळा उघड झाला आहे. हे प्रकरण सरकारनेही गांभीर्याने घेतले असून, या घोटाळ्यास जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांना ईडीच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. आज बुधवारी राज्याचे कृषी आयुक्त तथा छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनाही ईडीने नोटीस जारी केल्याचे वृत्त खासगी वृत्तवाहिणींनी प्रसारित केले आहे. घरकुल घोटाळ्यासंदर्भात वृत्त प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.