लालूंची कन्या मिसा भारती अडचणीत

32

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची ज्येष्ठ कन्या व राज्यसभा खासदार मिसा भारती अडचणीत आल्या आहेत. ईडीने मिसा यांचे सनदी लेखापाल (सीए) राजेश अगरवाल यांना ८ हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे.

लालू यादव व त्यांच्या कुंटुंबियांनी हजारो कोटींची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप भाजपचे बिहारमधील नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला होता. त्यानंतर ईडीने लालूंविरोधात जोरदार मोहिम सुरु केली. लालू यादव यांच्याशी संबंधित असलेल्या दिल्ली व गुरुग्राम येथील २२ ठिकाणांवर ईडीने छापे घातले. यावेळी काही महत्वाचे दस्तावेज अधिकाऱ्यांच्या हाती लागले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीने आज मंगळवारी अगरवाल यांच्या कार्यालयावर छापा घातला . अगरवाल यांचे अनेक राजकिय पक्षांबरोबर लागेबांधे असल्याचा ईडीला संशय आहे.

लालूंनी १५ वर्षात कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.

दरम्यान ईडीच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या लालूंनी भाजप व आरएसएसच्या नेत्यांना खुले आवाहन दिले आहे. दिल्लीतील खुर्चीवरुन खाली खेचेल. भाजप व आरएसएस माझ्यावर सूड उगवत आहेत असा आरोपही त्यांनी केला होता. तसेच मोदी सरकारच्या धोरणावरही लालूंनी कडाडून टीका केली आहे. मोदी सरकार ५ वर्ष टिकणार नाही असेही ते म्हणाले आहेत. तसेच २७ ऑगस्टला सरकारविरोधात विशाल मोर्चा काढण्याचा इशाराही लालूंनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या