अडचणीची लोकल

16
  • ज्ञानेश्वर भि. गावडे

उपनगरी रेल्वेमार्गावर भविष्यात वातानुकूलित एसी लोकल चालविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबईत ४७ एसी लोकल दाखल करण्याचे नियोजन केले गेले आहे. या ‘एसी लोकल’ बारा डब्यांच्या असून त्यांना स्वयंचलित दरवाजे, महिला प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी टॉकबॅक यंत्रणा, सीसी टीव्ही कॅमेरे आदी अत्याधुनिक सेवासुविधा असणार आहेत. एका बारा डब्यांच्या लोकलची किंमत अंदाजे ७५ कोटी रुपये असून ४७ लोकलसाठी अंदाजे साडेतीन हजार कोटी रुपये खर्चावे लागणार आहेत. सध्या रेल्वे प्रवासात होणारी घमासान गर्दी, गाडय़ांची अपुरी संख्या, अपुरा सेवकवर्ग, वीजपुरवठ्यातील अनियमितता, पुरेशा वीजपुरवठ्याचा अभाव, वातानुकूलित सेवेला मिळणाऱ्या प्राधान्यक्रमाचा इतर सेवांवर होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेता एसी लोकल सेवेचा सर्व अंगांकडून विचार व्हावा अशी अपेक्षा आहे, नुकतीच बारा डब्यांची एसी लोकल सेवा चर्चगेट-विरार मार्गावर सुरू करण्यात आली. त्यामुळे नेहमीच्या तब्बल बारा डब्यांच्या बारा गाड्या बाजूला ठेवाव्या लागल्या. त्याशिवाय काही गाड्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत. एका संशोधनानुसार मुंबईच्या लोकलमध्ये गर्दीच्या वेळेत दर चौरस मीटर सरासरी जागेत तब्बल दहा प्रवासी प्रवास करतात. याउलट एसी लोकलमध्ये एका प्रवाशाला एक चौरस मीटर जागेचा प्रबंध करावा लागतो. मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱयांची संख्या दिवसाला सत्तर ते पंच्याहत्तर लाख आहे. अशा मोठ्या प्रवासी संख्येतील वर्तुळात मूठभर मंडळींसाठी एसी लोकल उचित वाटत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या