शिक्षण बोर्डातील कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत,सचिव पुण्यात अडकल्याने अडचणी

277

लॉकडाऊमुळे सगळ जग थांबले आहे. परंतु घरचा उदर निर्वाह चालवण्यासाठी कामाचा मोबदला म्हणून हक्काचा पगार वेळेत मिळावा अशी मागणी विभागीय शिक्षण बोर्डातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होते आहे. मात्र विभागीय सचिव यांच्या सहीमुळे हे वेतन अडले आहे. अशी माहिती बोर्डातील सूत्रांनी दिली.

विभागीय शिक्षण मंडळात पन्नासहून अधिक नियमित असलेले कर्मचारी काम करतात. सध्या देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र या बंदच्या काळात सर्व घर खर्च चालवण्यासाठी मिळणारा पगार आवश्यक आहे. मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद असल्याने विभागीय शिक्षण मंडळातील सर्व कर्मचारी देखील घरी आहेत. तर विभागीय सचिव सुगता पुन्ने या पुण्यात अडकल्या आहेत. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय वेतन होवू शकत नाही, अशी माहिती बोर्डातील सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या