अमित शहा यांच्यावर अंड्यांचा वर्षाव

30
amit-shah

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर अंड्यांचा वर्षाव करण्यात आला.

अमित शहा सोमवारी रात्री एका कार्यक्रमासाठी सोमनाथ येथे जात होते. प्रवासादरम्यान अमित शहा आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा जुनागडमधील केशोद भागातून पुढे जात असताना अज्ञात जमावाने अंड्यांचा वर्षाव केला. ही घटना रात्री ११.३० वाजता घडली. अंड्यांचा वर्षाव सुरू होताच गाड्या वेग वाढवून पुढे निघून गेल्या. अंडी फेकणारे पाटीदार समाजाशी संबंधित असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. याआधी सूरत येथे पाटीदार समाजाच्या नागरिकांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यामुळे कार्यक्रम अर्धवट सोडून अमित शहा यांना कार्यक्रम स्थळावरुन निघून जावे लागले होते.

मागच्या वर्षी आरक्षणासाठी पाटीदार समाजाने आंदोलन केले होते. हे आंदोलन चिरडण्यासाठी अमित शहा यांच्याच सांगण्यावरुन आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला असा आरोप पाटीदार समाज करत आहे. अमित शहा यांचा निषेध करण्यासाठी गुजरातमध्ये ज्या-ज्या वेळी संधी मिळेल त्यावेळी पाटीदार विविध पद्धतीने नाराजी प्रकट करत आहेत. सोमवारी रात्री पाटीदारांची नाराजी अंड्यांच्या वर्षावातून पुन्हा एकदा जाहीर झाली.

आपली प्रतिक्रिया द्या