माजी मुख्यमंत्र्यांवर अंडी, सडलेले टोमॅटो व चपला फेकल्या

4929

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर गुरुवारी विशाखपटनम येथे अंडी, सडलेले टोमॅटो व चपला फेकण्यात आल्या. वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. त्यामुळे हा हल्ला वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप होत आहे.

chandrababu-naidu

विशाखापटनम मधील पेंडुर्थी भागात काही दलित शेतकरी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची जमिन हडपल्यााचा आरोप करत आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी चंद्राबाबू निघाले होते. त्यावेळी विमानतळाबाहेर त्यांच्यावर अंडी, चपला व टोमॅटो फेकण्यात आले. विमानतळावरून त्यांचा ताफा पेंडुर्थीकडे जात असताना वायएसआर काँग्रेसच्या कार्याकर्त्यांनी त्यांचा ताफा रोखला. या कार्यकर्त्यांनी कोलकाता चेन्नई महामार्ग रोखून धरला होता. चंद्राबाबूंनी तब्बल दोन तास गाडीत वाट पाहिली त्यानंतर ते चालत आंदोलनाच्या ठिकाणी जायला निघाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले.

आपली प्रतिक्रिया द्या