इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचे निधन

461

इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. 30 वर्षे ते राष्ट्रपती होते. 2011 मध्ये बंड झाल्यामुळे त्यांना सत्ता सोडावी लागली होती.

काही दिवसांपासून होस्नी मुबारक हे आजारी होते. गेल्या आठवडय़ात त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. आज मंगळवारी त्यांचे निधन झाल्याचे इजिप्तच्या सरकारी वृत्तवाहिनीने जाहीर केले. 1981 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती अन्वर सादात यांची हत्या झाल्यानंतर उपराष्ट्रपती होस्नी मुबारक यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर 2011 पर्यंत इजिप्तवर त्यांची अनभिषिक्त सत्ता होती. 2011 मध्ये जनतेनेच त्यांच्याविरोधात बंड पुकारले. त्यामुळे होस्नी मुबारक यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली होस्नी मुबारक यांना अटकही करण्यात आली. 2017 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

आपली प्रतिक्रिया द्या