100 वर्षांपासून ज्याला ‘पुजारी’ समजत होते ती निघाली गर्भवती महिलेची ‘ममी’!

इजिप्त हा देश प्राचीन संस्कृती आणि रहस्यमय वस्तूंसाठी ओळखला जातो. गिझाचे पिरॅमीड, देवदेवतांची हजारो वर्षांपूर्वीची मंदिरं, थडगी, ममीज् असा मोठा ऐतिहासिक खजिना या देशामध्ये आहे. इजिप्तमध्ये सापडणाऱ्या ममीज् आपल्या पोटामध्ये अनेक रहस्य बाळगून असतात आणि काळानुसार यावर प्रकाश पडत राहतो. नुकत्याच एका संशोधनामध्ये गेल्या 100 वर्षांपासून ज्याला मंदिराचा पुजारी समजले जात होते, ती एका गर्भवती महिलेची ममी असल्याचे उघड झाले आहे. पोलंडच्या ‘यूनिवर्सिटी ऑफ वॉरसॉ’च्या संशोधकांनी हा शोध लावला आहे.

मार्जेना ओजारेक-जील्क यांच्या नेतृत्वाखाली ‘यूनिवर्सिटी ऑफ वॉरसॉ’चे संशोधकांचे एक पथक 2015 पासून इजिप्तमध्ये सापडलेल्या ममीज् वर संशोधन करत आहे. यादरम्यान ज्या ममीला मंदिरातील पुजाऱ्याची (Priest) ची ममी मानले जात होते, ती खरे तर एका गर्भवती महिलेची ममी असल्याचे उघड झाले. स्कॅन दरम्यान या ममीच्या पोटामध्ये एक छोटासा पाय दिसून आला. यानंतर ही गर्भवती महिलेची ममी असल्याचे समोर आले, अशी माहिती मार्जेना ओजारेक-जील्क यांनी न्यूज एजन्सी PAP ला दिली.

egypt-mummy

दरम्यान, या प्रोजेक्टचे सह-संस्थापक वोहटेक एमंड यांनी CNN शी बोलताना सांगितले की, इंजिप्तमध्ये सापडलेली ही मी 1826 रोजी पोलंडला आणण्यात आली होती. सुरुवातीला ही एका महिलेची ममी असल्याचे मानले जात होते, मात्र 1920 च्या दशकामध्ये ही ममी पुजाऱ्याची असल्याचे मानले गेले. मात्र आता ही मी गर्भवती महिलेची असल्याचे उघड झाले आहे.

अद्भुत! अविश्वसनीय!! अकल्पनीय!!! इजिप्तमध्ये सापडले 3400 वर्ष जुने ‘सोन्याचे शहर’

असा लागला शोध

संशोधनादरम्यान कॉम्प्यूटर टोमोग्राफीच्या मदतीने ममीला बांधण्यात आलेल्या पट्ट्या न खोलता ती स्कॅन करण्यात आली. स्कॅनिंगदरम्यान ममीला पुरुषांचे लिंग नसल्याचे समोर आले. तसेच 3 डी इमेजिंगमध्ये ममला लांब कुरळे केस आणि स्तन असल्याचाही दुजोरा मिळाला. ही महिला 20 ते 30 वर्षांची असून 26 ते 30 आठवड्यांची गर्भवती होती. तिला मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही.

egypt-mummy-priest-pregnant

आत भ्रूण राहिले कसे?

दरम्यान, यामुळे एक वेगळाच प्रश्न संशोधकांसमोर उभा ठाकला आहे. कारण आजपर्यंत असे मानले जात होते की ममी बनवण्यासाठी मृताच्या शरीरातील सर्व अंग काढण्यात येत होते. असे असेल तर या महिलेच्या पोटामध्ये भ्रूण कसे राहिले? यामागे काही धार्मिक कारण आहे का? याचाही शोध संशोधक घेत आहेत.

अद्भूत! पृथ्वीवरील सर्वात जुने ‘पाणी’ सापडले, वय फक्त 160 कोटी वर्ष

आपली प्रतिक्रिया द्या