नोकरीचे आमिष दाखवून तरूणांना ७६ लाखाला गंडवले

22

सामना प्रतिनिधी । वसमत

वसमत तालुक्यातील कुडाळा येथील तरूणासह आठ जणांना राज्य राखीव पोलीस दलात नोकरी लावतो असे सांगून ७६ लाख ४१ हजार रूपयांची फसवणूक केल्याने वसमत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

वसमत तालुक्यातील कुडाळा येथील भागवत बाबुराव चव्हाण (26) या युवकासह आठ बेरोजगार तरुणांना एस.आर.पी.एफ पुणे येथे शिपाई पदावर नोकरीस लावतो असे सांगून आर्थिक फसवणूक करण्यात आली. योगेश काळे, अंजली सुर्यवंशी रा. अंबेजोगाई जिल्हा बीड, बालाजी वाघमारे, गजानन वाघमारे दोघे रा अहमदपुर जिल्हा लातुर, सदाशिव शिक्रे रा. नहाद ता. वसमत यांनी फिर्यादी भागवत चव्हाण व त्यांचे साक्षीदार यांना संगनमताने एस.आर.पी.एफ पुणे येथे शिपाई पदावर नोकरीस लावतो म्हणून फसवणूक केली. चव्हाण यांच्या नातेवाईकांना स्वतः भेटून व वेळोवेळी दुरूध्वनीवरून नोकरी लावतो असे सांगून सतत पैशांची मागणी केली व बनावट नियुक्तीपत्र देवून स्वतःच्या खात्यावर २०१७ ते २०१८ या दरम्यान ७६ लाख ४१ हजार रुपये घेऊन तरूणांची फसवणूक केल्याची तक्रार भागवत चव्हाण यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या