एका लग्नाची पुढची गोष्ट नाबाद 400

अभिनेता प्रशांत दामले आणि अभिनेत्रा कविता लाड- मेढेकर यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या सदाबहार नाटकाची 400 व्या प्रयोगाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येत्या 6 मार्च ते 14 मार्च दरम्यान या नाटकाचे प्रयोग राज्यभरात होणार आहेत. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात 393 वा प्रयोग 6 मार्चला दुपारी 4.30 वाजता आहे, तर 400वा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 14 मार्चला सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.

याविषयी माहिती देताना प्रशांत दामले म्हणाले, रिपीट ऑडियन्सने ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाला खऱया अर्थाने आपल्या मनात स्थान दिलेआहे. नाटकाने मिळवलेले हे यश रसिकांनी आमच्यावर केलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे. लॉकडाऊननंतर जेव्हा या नाटकाने  मराठी रंगभूमीचा पडदा उघडला, तेव्हाही रसिकांनी मनापासून प्रेम करत गर्दी करणं ही या नाटकाची पुण्याई आहे. 400 व्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे कोण असतील हे  गुपित आहे. पण तुमच्यासाठी सुखद धक्का असेल.

आपली प्रतिक्रिया द्या