‘एकदा काय झालं…’ बोस्टन महोत्सवात! तीन विभागांत मिळाली नामांकने

‘इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टन 2021’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये डॉ. सलील कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘एकदा काय झालं…’ या चित्रपटाला तीन विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्पृष्ट अभिनेता (सुमित राघवन), सर्वोत्पृष्ट बालकलाकार (अर्जुन पूर्णपात्रे) आणि ‘रे क्षणा…’ या गाण्याला सर्वोत्पृष्ट गीत या विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत. हे गाणे शंकर महादेवन यांनी गायले असून ते सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले आहे. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी हे गाणे लिहिले आहे. याशिवाय ‘शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल 2021’ साठीसुद्धा या चित्रपटाची निवड झाली आहे. चित्रपटगृहे सुरू होताच हा चित्रपट प्रदर्शित होईल.

आपली प्रतिक्रिया द्या