महापालिकेपासून सहकारी बँकेवरील भाजपच्या सत्ताकेंद्राचा अस्त होण्याची चिन्हे

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे जळगावमध्ये भाजपला महानगर पालिका, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा दूध संघाच्या सत्तेवर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत.

जळगावमध्ये मागील तीन दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची मोठी किंमत भाजपला स्थानिक पातळीवरही मोठी चुकवावी लागेल असे दिसते. कारण जळगाव शहर महानगरपालिकेत सध्या भाजपाची एकहाती सत्ता आहे. तरीदेखील गट तटाने पोखरले गेल्यामुळे भाजपाला स्वकियांचाच सामना करावा लागत आहे. पक्षांतर्गत बंड शमविण्याचे आव्हान असतानाच दुसरीकडे खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर जळगाव महापालिकेत सत्तांतर घडवून आणण्याच्या दृष्टीने व्ब हरचना आखली जात असल्याचे सांगण्यात येते. ही क्युहरचना यशस्की झाल्यास भाजपला परत किरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची वेळ येईल. त्याशिवाय जिल्हा परिषदेत देखील 16 ते 18 सदस्यांचा गट खडसेंच्या समर्थनार्थ बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे एकनाथ खडसे यांची मुलगी अँड. रोहिणी खडसे-खेवलकर या सध्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. तर खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष आहेत. महानंदच्या अध्यक्ष म्हणूनही त्या काम पहात आहेत. जळगाव जिल्हा दूध संघ आणि जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आहे. खडसेच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे सहकार क्षेत्रातील या दोन प्रमुख संस्थांचा गड भाजपच्या हातून निसटणार अशी चिन्हे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या